जळत होता आसमंत
पेटत होतं पाणीसुद्धा
"ह" सुद्धा उच्चारलात
तर जात होते प्राण......
"म" जरी बोललात
तरी कापत होती मान!
खरंतर,
ह काय किंवा म काय
हम होऊ शकले असते!
पण तसं झालं नाही,
'त्यां' नी होऊ दिलं नाही;
फळं भोगतोय आम्ही.......
..... अजूनही अंधारात,
धगधगत्या अंगारात
विझली वात चालते आहे,
वाताहत पाहते आहे!
या धुमसत्या निखाऱ्यांतही
ती तेवायची नाही....
तिला थोडासा "स्नेह" हवा आहे!!!