प्रिय मनोगतींना नमस्कार!
अलीकडेच मला एक विरोप आला. (कदाचित तुम्हांपैकी बऱ्याच जणांना/जणींनाही आला असण्याची शक्यता आहे!)
घटनेच्या ४९-ओ या कलमाबाबतीतला. यानुसार:
भारतीय राज्यघटनेच्या १९६९ कायद्याच्या कलम ४९-ओ अन्वये मतदार मतदान केंद्रावर जाऊन, आपली मतदार म्हणून ओळख पटवून ( यादीतील नाव आणि स्वतःजवळील ओळखपत्राच्या मदतीने), बोटावर खूण करून घेऊन, त्या केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्याला असे सांगू शकतो/ते कि "मला कुणालाही मत द्यावयाचे नाही"
यामुळे असे होते की जर एखाद्या मतदारसंघातील एखादा/दी उमेदवार समजा १००० मतांनी निवडून आला/ली असेल आणि त्या मतदारसंघात ( त्या उमेदवाराला नव्हे! ) १००० पेक्षा जास्त "४९-ओ" मते असतील तर ते मतदान रद्दबातल ठरवून फ़ेरनिवडणूक घेतली जाते. इतकेच नव्हे तर, जिंकला/ली गेलेला/ली उमेदवार फ़ेरनिवडणुकीस अपात्र ठरविला जातो/ते. तो/ती पुन्हा त्या निवडणुकीस उभा/भी राहू शकत नाही. (...हे कबूल करतो की इतर उमेदवारांचे काय होते हे मात्र मला माहित नाही..)
हे कायद्यातीलच कलम असल्यामुळे हा आपला हक्क आहे. आता तो कितपत वापरायचा हे ज्याचे त्याने/जिचे तिने ठरवावे. ही माहिती द्यावीशी वाटली म्हणून हा सर्व उद्योग.
.............................................................................................कृष्णकुमार द. जोशी