शंतनू

चालता अशी तूं लयीत एका

रूपगर्विते ठुमकत ठुमकत-

लागेन कच्छपी तुझ्या परंतु

केविलवाणे ठसकत ठसकत ।

डोळ्यातिल मासोळ्या काळ्या

फिरवत ठेवी गरगर गरगर

लागतील केव्हां गळास  पाहीन

भुरक्या डोळ्यांची करुनी किलकिल ।

केतकी सुगंधित नागिण काळी

अशी जा तूं झुलवत झुलवत

वाजवीन पुंगी बोळक्यातुनी

हात टक्कली फिरवत फिरवत ।

कुंभांचा टेंभा छातीवरल्या

मदभरे चाल तूं मिरवत मिरवत

अनुभवीन गरमी कानशिलांची

वाकून चालता रखडत रखडत ।

आवृत्त वृत्ताकार नितंबा

दे आंदोलन घुसळत घुसळत

प्राण पणाला लावुन याचीन

या अस्थिपंजरा नवसंजीवन, नवसंजीवन ॥