मला माझाच ऐकू येइ ना आवाज, राखा शांतता !
जरासा घेउ द्या माझा मला अंदाज, राखा शांतता ॥
इथे गोंगाट आहे जीवनावर बोलणाऱ्यांचा सदा
करू द्या नीट त्यांना रोज त्यांचे काज, राखा शांतता ॥
कुणाला माहिती की, चोर कुठला? आणि संन्यासी कुठे?
कळेलच, फास कोणा, आणि कोणा ताज, राखा शांतता ॥
कसा रंगांधळ्यांना रंग सांगू जीवनाचा वेगळा?
करू द्या रंग एकच पाहण्याचा माज, राखा शांतता ॥
तुझे-माझे, तुझे-माझे असे चालायचे याहीपुढे
समाधानास तुमच्या हारतो मी आज, राखा शांतता ॥
(ह्या कवितेस गझल म्हणता येईल का? तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.)