ओलेती

ओलेती सन्ध्याकाळ
निश:ब्द शान्त
सारा आसमन्त
तृप्त तृप्त

तू आणी मी
झरती जलधारा
अन्गास बिलगतो
मिलनोत्सुक वारा

झुकलेली पापणी
ओठ मिटलेले
सार्या भावनाना
तराणे फुटलेले

हलकेच कुणी
गुणगुणला मारवा
भान विसरून
जीव बावरा

अन्ग ओलेचिम्ब
थरथरती काया
कडाडे वीज
सौन्दर्य पहाया

माझा हात
तुझ्या हातात
अधरान्ची भाषा
स्पर्श बोलतात

उमलते भाव
तुझ्या डोळ्यात
रन्ग खेळतात
नजरेच्या तळ्यात

सम्पल्या श्रावणसरी
मोकळे नीलान्गण
विरहाचे क्षण
जाळतात कणकण

पुनश्च मिलन
वचन पावसाचे
कासाविशी वाढविती
लोचन आसवान्चे

सुप्रिया