सच का सामना सध्या टि. व्ही. वर बऱ्यापैकी गाजत असणारा रिअँलिटी शो. या शोचे नाव सामने आया सच असे पाहिजे होते, हा शो पाहताना एकातरी स्पर्धकाने सच का सामना केला आहे असे वाटत नाही. तुमच्या आयुष्यात अनेक भानगडी असतील तरच तुम्ही येथे पाऊल ठेवा. उदा. समजा तुम्ही पुरुष आहात. आपण मित्राच्या पत्नीला बहीण मानता तर सच का सामनामध्ये भाग घेण्याचे विसरून जा. तुम्ही मित्राच्या पत्नीजवळ लफडं केलं असेल तर बिनधास्त भाग घ्या, तुम्ही आयुष्यात चोरी केली आहे?, बायको शिवाय तुमचे बाहेर प्रकरण सुरू आहे?, तुम्हाला अनौरस संतान आहे?. दुसऱ्याची ईस्टेट हडपली आहे?. याचे उत्तर हो असेल तुम्ही सच का सामनामध्ये भाग घेण्यास १०० % लायक आहात. समजा तुम्ही महिला आहात.
तुम्हाला लग्नाआधी मुलं झालंय? नालायकपणा केल्यामुळे तुम्हाला शाळेतून काढून टाकले आहे? नवऱ्याशी
अनेक वेळा बेवफाई केली आहे? याचे उत्तर हो असेल तर सच का सामना आपल्या सारख्या मजबूत स्पर्धकांची वाट पाहतोय.. खरच यातून सच का सामना होतो का