***********************
***********************
रिवाज असेही बदलून झाले
तुझे शिताफीने फसवून झाले
जुन्याच नाटकाची तालीम ही
संवाद तस्सेच गिरवून झाले
अकस्मात भेटला तो मनस्वी
पाडायचे मनोरे बांधून झाले
अपुरे संदर्भ, उसने दिलासे
तिचे ते तसेही पटवून झाले
खोट्या कहाण्यां, खोटेच खेळ
स्वप्नांनाही मस्त फितवून झाले
लपंडाव हा संपवावा आता
तुला कितीदा निक्षून झाले
अभिनयाची कमाल केव्हढी
तुझेच कितीदा जिंकून झाले
गुंतल्या श्वासांची चर्चा पुरे
मागचे ते सारे पुसून झाले
शिक्षेचा काही पार ना उरला
तुझे गुन्हेंच नाकारून झाले
भविष्यांत फसगत पुन्हा नाही
आयुष्यांस माझे बजावून झाले
************************
************************