आभाळाचा केला कागद अन समुद्राची केली शाई
तरी आईचे महात्म्य लिहून होणार नाही.
मला मात्र सांगायचंय वेगळंच काही
प्रत्येकीत एक लेक अन एक आई दडून राही.
आईची लेक म्हणून जगणं खूप सोपं असत
लेकीची आई म्हणून तेच जगणं कठीण वाटत.
आई आपला भूतकाळ, लेक आपला भविष्यकाळ
आई म्हणजे आठवणींचा वसा, लेक म्हणजे उद्याची आशा
आईच्या संस्कारांना पुढे न्यायच असत
ओल्या मातीच्या गोळ्यातून लेकीला घडवायचं असत.
आजीसाठी नात म्हणजे दुधावरची साय
पण नातीच्या मनात आजीला जागा आहे काय?
सुपुत्री ही सुमाता बनू शकेल का?
संस्कारांचा झरा वाहून नेईल का?
परंपरेचा वसा पुढे चालवेल का?