रात्री ८:०५ ला मोबाईल वाजला .."Abhishek Calling"..
"हा बोल अभ्या, आज बऱ्याचा दिवसानी फोन केलास ? "
"हो अरे .. तुला तो चाणक्य आठवतोय का ?, पुष्कर चा मामे भाउ .. मुंबई चा .. "
"चाणक्य न आठवायला काय झाल ? चांगला आठवतोय की "..
"अरे तो गेला .. "
"गेला ? कुठे Foreign la गेला का ?"
"अरे , गेला म्हणजे गेला , वारला .. "
"काय सांगतोयस काय अरे अभ्या ? कस शक्य आहे ? "
"रेल्वे अपघात झाला अस कळलय .. बर , तू घराखाली येऊन थांब , मी तुला घ्यायला येतोय .. आपल्याला पुष्कर कडे जयच आहे .. "
चाणक्य मुंम्बई चा राहणारा .. आमचा ट्रेक ग्रुप मधला मित्र .. आमच्या बरोबर किल्ल्यावर जाण्यासाठी २-३ वेळा मुंबई वरून आला होता ..
विश्वास बसतच नवता .. हे कस शक्य आहे ? ..
पुष्कर गच्चीत एकटाच बसला होता .. रडून रडून त्याचा डोळ्यामधले पणीच संपले होते ..
"पुष्कर , झाल ते झाल, तू आता जरा मन खंबीर कर please .. " अभ्या नि धीर देण्याचा एक प्रयत्न करून पाहिला ..
पुष्कर बोलता झाला .. "अरे भुषण्या , तो F.Y ला होता रे .. काय आयुष्य जगला रे .. आताशी त्याला काहीतरी कळायला लागले असेल रे .. आणि देवानी पण बघ ना कसा foul केला .. "..
"कस काय झल रे पुक्या ? काही कळल का ? "
"कोणालाच काहीच माहीत रे .. मी तिकडे जाइन तेव्हाच कळेल .. "
त्या रात्री पुष्कर आणि त्याच्या घरचे मुंबई ला गेले ..
दुसऱ्या दिवशी अभ्या भेटला ..
"अभ्या काही कळल का रे चाणक्य च ? कसा गेला वगैरे ? "
"अजूनही नक्की माहिती मिळाली नाही .. पण लोकल चा बार धरायला गेला आणि हात सटकला त्याचा .. खाली पडला आणि त्याचे पाय अडकले , नंतर तो १८० अंशात फिरला गेला आणि मग त्याच्या डोक्याला जबर मार बसला .. "
"हा मग .. पुढे? .. तो तर hospital मध्ये नेल्यावर गेला अस कळल ... कोणी नेला त्याला Hospital मध्ये ? "
"मला अजून माहीत नाही रे कोणी नेला ते ..पण तो त्याच जखमी अवस्थेमध्ये २० -२२ मिनिटे पडून होता .. त्याला कोणीच उचलले नाही .. आणि कोणी जास्ती लक्ष पण दिले नाही .. "
"अरे काय सांगतोयस ? अस कस कोणीच लक्ष दिले नाही ? लोक नव्हते का तिकडे ? "
"अरे भुषण्या , ति मुंबई आहे रे .. तिकडे कोणाला वेळ नसतो रे .. "
"अरे पण त्याला जरा लवकर नेला असता तर तो कदाचित वाचला असता .. बरोबर ना ? "
"कदाचित ? "
"अरे वाचला असता का नाही ते सोड रे .. पण त्याला लगेच दवाखान्यात न्यायला नको का लोकानी ? "
"सोड रे भुषण्या.. हाच आपला समाज आहे .. जोपर्यंत स्वतःवर वेळ येणार नाही ना .. तोपर्यंत काहीच कळणार नाही ह्या लोकाना ... "...
-----------x---------------x----------------x-------------------x
मित्रांनो , तुम्ही तिथे असता तर काय केलं असत ? आणि चाणक्य च्या जागी तुमचा मित्र / मुलगा / भाउ असता तर ???