आपलेच शब्द.

स्वतःतूनच वाटा निघून इथे तिथे नेऊ बघतात

कधी कुणाच्या ओल्या हाका रस्ते बनून समोर येतात.

ओढाळ होऊन गेल्यावर कुठे भिंत समोर येते

कुठे दलदल असल्याचे फसल्यावर कळून येते.

कधी पाठ फिरवल्यावर कोणी मागून धावत येते

मानेवर उच्छ्वासाचे अत्तर अल्लद लावून जाते.

भटकणारे सारेच मेघ 'दूत' बनून उडत नसतात

तरीही काही झुळकींची हळवी गाणी वाहून नेतात.

आपलेच शब्द मग रिमझिमीतून ऐकू येतात

आपल्या-परक्या वाटा तेंव्हा मनामध्ये विरून जातात.

जतिन.