एका आनंदाचे क्षणी

एका आनंदाचे क्षणी 

मन फाटले फाटले
होवूनिया पाखरू
थेट आभाळा भिडले
एका आनंदाचे क्षणी 
मन मोराचा पिसारा
सुखावून जातो हळू 
गोड वसंताचा वारा
एका आनंदाचे क्षणी
लाख फुलं मनात
फुलं वेचता वेचता
गीत येतया ओठात
एका आनंदाचे क्षणी 
सल मनामध्ये सले 
मूर्ती  तुझी हृदयात
आणि डोळे भरुनी आले..