एकटा चल - एकटा चल - एकटा चलऽऽ
तव मेळा पडला मागे३ - पथिका एकटा चलऽऽ ।ध्रु।
हजारो मैल वाटा लागती तुज बोलवाया
इथे बोलावती तुज त्या सहन दुःखे कराया
जगि कोण आहे, दुःखाने मन ज्याचे झाले न विकल१ ।१।
एकटा चल - एकटा चल - एकटा चलऽऽ ....
स्वतःवर प्रेम कर, जर ना कुणी तुज साथ द्याया
धरित्रीला करुन शय्या, गगन घे पांघराया
खेळून झाला जीवनखेळ तुझा ना अद्याप सकल२ ।२।
एकटा चल - एकटा चल - एकटा चलऽऽ....
टीपा :
३. पर्याय :
तव मेळा सोडुन गेला -
तव मेळा राही मागे -
१, २ : या शब्दांचे उच्चार विकल् सकल् असे करावे
चालः मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे
शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक अल असे हवे. लच्या आधीचा स्वर : अ च्या जागी इ किंवा उ हा ऱ्हस्व स्वर चालणार नाही ... तो कानाला चांगला वाटणार नाही. अच हवा
यमकाची जागा ठळक केलेली आहे.