दूरदर्शनवरील मालिका बघण्याचे मी बऱ्याच प्रमाणात टाळतो तरीही पूर्वी सारेगामा ही झी टी.व्ही.वरील मालिका मी हौसेने पहात असे.बऱ्याच चांगल्या तरूण गायक गायिका त्यावेळी ऐकायला मिळाल्या मुख्य म्हणजे त्यावेळी खरोखरच संगीतातील गुणवत्ता हा एकमेव निकष लावला जात असे.आज मात्र मतदान पद्धतीमुळे त्याच मालिकेतील गुणवत्तेचे स्थान घसरत चालले आहे.त्यातील एक परीक्षक श्री हरिहरन् हेसुद्धा वैतागून I am fed up with this systemम्हणून उठून निघून गेलेले पाहिले.कलेच्या क्षेत्रात ही मतदान पद्धत योग्य आहे असे आपल्याला वाटते का?मनोगतींचा प्रतिसाद अपेक्षित आहे.