महोदय,
मी एक पक्का खवैय्या पुणेकर आहे. पुण्यातील अनेक उपहार ग्रुहे त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. मला आवडणारया काही उपहार ग्रुहांची यादी मी देत आहे.
आपणांस माहित असलेल्या इतर उपहार ग्रुहांची नावे; पत्ता आणि खाद्यपदार्थांसह द्यावी ही विनंती. तेवढीच पेट्पुजेची संधी मिळेल.
*तीखट आणी शाकाहारी काहीही. especially 'रामनाथ' ची एक्स्ट्रा जवा-मर्द कोल्हापूरी मीसळ.
* कल्याण (बेलेश्वर) भेळ, भांडारकर रोड
* आप्पाची खिचडी- काकडी, डेक्कन
* मानकर डोसा , (सातारा रोड)
* तिलक चा चहा, pattice , (टिळक रोड)
* जोशी वडापाव / खत्रींचा वडापाव , (बालगंधर्व)
* बापटांचा दही भात , (बाजीराव रोड)
* सुजाता ची मस्तानी, (निंबाळकर तालीम)
* चितळ्यांची बाकरवडी (बाजीराव रोड)
* काका हलवाईंचा सामोसा, veg pattice, काजु रोल (टिळक रोड)
* कैलास आणी लक्ष्मी ची लस्सी (बाजीराव रोड)
* श्रेयस च जेवण (आपटे रोड)
* वाडेश्वर आणी वैशाली चा वडा /ईडली सांबार (FC)
* मथूराची बिरडाची ऊसळ आणी भरलेल वांग (JM)
* दर्शनच्या continental dishes, especially बेक्ड बीन्स (भांडारकर रोड)
* कोल्हापूरच्या फ़डतरेन्ची मीसळ
* आपल्या बळूच्या ढाब्याची कांदा भजी (सिंहगड)
* दुर्गाची cold coffee , (कोथरूड)
* मनमितचा बत्तासा चाट , (FC)
* SS चा मसाला ब्रेड, (स.प)
* गुड-लक चा चहा-बन , (डेक्कन)
* स्विकारचे उपीट आणी पोहे, (पौड रोड)
* पुष्करणी भेळ
धन्यवाद.