ज़नाना पाहिला, आलो, खुळ्यागत हिंडणे आले
उताविळ बाहुल्या आता उरी कवटाळणे आले
तुझ्या होत्या सख्या साऱ्या, तुझ्यापेक्षा किती उजव्या
चहासाठी न त्यांच्या का घरी बोलावणे आले?
तुला मी भेटलो होतो, दिसाची त्या फळे असली
नशीबी त्या दिसापासून हे पस्तावणे आले
असायाचे नवे एक पाखरू बाहूत नेमाने
तुझ्या रूपात माझ्या जीवनी बुजगावणे आले
तुझ्या नुसत्याच स्मरणाने उभा काटा पहा राही
तुझे दर्शन घडे जेव्हा भयाने कापणे आले
तशी ही खोडसाळाची असावी खोड जन्माची
जिथे दिसला बरा चेहरा तिथे रेंगाळणे आले
आमची प्रेरणा - चित्तरंजन ह्यांची सुंदर गझल 'तुझ्या शहरात मी आलो' इथे वाचा
.