कधी जायचा निघून विखार
कधी यायचे फुलून शिवार
नवी मागणी हरेक क्षणात
पुरे व्हायचा कुठून पगार
तुला पाहता उदास मनात
पुन्हा यायचे भरून विकार
तुला पाहता समोर क्षणात
पुन्हा जायचे पळून विचार
नवा डाव हा , जरी जन तेच
करा तोच ओरडून प्रचार !
--अदिती
(१९ ऑक्टोबर २००६)
धनत्रयोदशी, शके १९२८
टीप: ही गज़ल असावी असा मला अतिशय दाट संशय आहे म्हणून इथे लिहीत आहे. गज़ल असली तर उत्तमच नसली तर गाजराची पुंगी समजून सोडून द्यावी ही विनंती. सर्व सूचनांचे आणि अभिप्रायांचे स्वागत. हिच्या जातीबद्दल आणि वर्गीकरणाबद्दल तज्ञांनी आपले मत नक्की द्यावे.