मनाला तुझ्या सावरावे जरा तू
पुन्हा यातनांशी लढावे जरा तू
मजा वेदनेची निराळीच मित्रा
उरी वेदनेला धरावे जरा तू
तुझे मित्र व्हावे तुझ्या दुश्मनांनी
जगा वेगळे हे जगावे जरा तू
नको आसवांना असे रोज ढाळू
रडावे जगाने छ्ळावे जरा तू
भरारी पुन्हा उंच घ्यावीस गगनी
ख्ररा कोण त्यांना दिसावे जरा तू