तू घाव घातले अन

तू घाव घातले अन जगणे कठिण झाले
डोळ्यात आसवांचे लपणे कठिण झाले

सारेच दोस्त माझे झाले फितूर जेंव्हा
तेंव्हा मलाच माझे जपणे कठिण झाले

केले मनास माझ्या त्यांनेच जायबंदी
बंदीस्त पाख्रराला उडणे कठिण झाले

स्वप्नातली कळी तू मी दोस्त यातनांचा
येथे तुझे न माझे जुळणे कठिण झाले

विदुषक बनून आलो दुनियेत काय इथल्या
होताच खेळ चालू हसणे कठिण झाले 

हरवून पार गेला आनंद जिंदगीचा
आता सुखा तुझ्याशी जमणे कठिण झाले
---------------------दर्शन शहा