वासोटा

... समस्त मनोगतीना....


 मी मनोगत वर वाचनभक्ति करणारा एक... काल वसोटा बघुन आलो म्हणुन त्याचे अनुभव कथनाचा एक प्रयत्न... चुका समजुन घ्याव्यात.


गेले काही वर्षे ट्रेक बन्द ज़्हाले होते त्यामुळे या वेळी वासोटा ला जायचे या विचारानी मी खुष होतो. कार्यालयातील सहकार्या बरोबर जाण्याचा हा उपक्रम कसा काय जमेल असे विचार येत होते. २६ रविवार चा बेत ठरला ..


सकाळी ४.०० वाजता आम्ही सातारकडे चारचाकी मधुन कुच केले. ६.०० ला सातार गाठले. आधी ठरल्या प्रमाणे एक सहकारी आम्हाला सातारला भेटला. सातार ते बामणोली हा प्रवास १.३० तासात पार केला. अतिशय सुन्दर रस्ता होता दोन्ही बाजुनी दरी आणी मधे रस्ता असा प्रकार होता. समोर कास तलाव आणी कोयनेच्या धरणाचे पाणी दिसत होते. त्या पाण्यावर ढग,धुके दिसत होते आणि आपण आकाशातुन तर खाली येत नाही ना असा विचार मनात आला.


७.४५ ला बामणोली ला पोचलो. वन विभाग परवनगी,बोट ठरवणे इ. सोपस्कार पुर्ण केले. स्थानिक लोकानी तिकडे जळवा खुप आहेत काळजी घ्या इ. सुचना केल्या.त्याच्या मौलीक सुचना लक्षात घेवुन आयुशात प्रथमच तम्बाकुची पुडी विकत घेतली ( जळवाच्या वर औषध ..) आणी नौके मधे बसुन वासोट्या कडे प्रयाण केले.


कोयनेच्या धरणाचा साठा किती प्रचन्ड आहे त्याचा अनुभव घेत वासोट्या ला १.३० तासानी पोचलो. वासोटा किल्ला किती दुर्गम जागी आहे ते अनुभव घेण्या सारखे आहे. किल्याच्या पायथ्यापाशी परत एकदा वनखात्यामधे नाव नोन्दणी करुन किल्ला चढायला सुरवात केली. इथेच आम्हाला जळवाचे प्रथम दर्शन ज़ाले आणि त्या दिसतात कशा ते पण समजले. मारुती मन्दीरा पर्यन्त जळवा आहेत भराभर चला ही वन खात्याच्या लोकाची सुचना पाळत जोरात चलायला सुरवात केली.


दाट जगलामधुन जातानाचा आनद काहि औरच होता. चढण जास्त आसल्यामुळे आम्ही सावकाश चढत होतो. वाटे मधे एक ट्रेकर्सचा एक ग्रुप भेटला ते लोक नागेश्वर करुन परत जात होते. अस्वला पसुन साम्भाळा असा त्याचा सल्ला घेवुन पुढे निघालो.


साधारणपणे २-२.३० तासाच्या चढणी नतर वर पोचलो. वर एक मारुति मदिर भग्नावस्थेत आहे तिथेच एका सर्प राजानी दर्शन दिले.गडावर शकराचे एक मदिर आहे तिकडे बसुन पोटपुजा केली. जवळच्या तळ्यातले पाणी प्यायलो, प्रथम प्यावे का नाही असा सभ्रम होता पण काय होईल ते बघु असा विचार केला आणि तहान भागवली.


गडावरुन नगेश्वराच्या गुहा आणि वर फ़डकणारा भगवा ध्वज दिसतो. दुसर्या टोका वरुन जुना वसोटा, त्याचा बेलाग कडा (बाबु कडा ?) कोकण कड्याची आठवण करुन देतो.


२.३० च्या सुमारास गड उतरायला सुरवात केली. रमत गमत ३.४५ ला खाली पोचलो आमची नाव ४-४.३० येणार असल्यामुळे वन खात्याच्या लोकच्या कडे चहापान केले.


४.३० च्या सुमारास नावेत बसलो, बसल्यावर एकदा कुठे जळु नाही ना याची पहाणी केली त्या मधे असे अढळले की एका मित्रा ला गळु नी आपला प्रसाद दिला आहे. रक्त पिउन टम्मफ़ुगलेल्या जळुचे फोटो कढले. मित्राला मलमपट्टी करणार तर नावचालक म्हणाला काहि लावु नका चुना लावा मग तो उपचार केला. बर्याच वेळाने रक्त थामले. आश्चर्याची गोश्ट म्हणजे त्या मित्रा ला जळु चावात असताना एक कण पण समजले नाही.


६.०० ला बामणोली ला पोचलो थोडी पोट पुजा केली आणी परतीचा प्रवास सुरु केला १०.०० ला पुण्यात पोचलो. एक छान ट्रेक चे समधान मिळाले.