दाटले हृदयात माझ्या

दाटले हृदयात माझ्या ते तुझ्या कानी पडावे
केस सावरणे तुझे, शृंगारणे पुन्हा घडावे

देव तू बनवून मजला प्रीतिने केलीस पूजा
प्रेम माझे सांगते मज, देवपण तुजला जडावे

थांग अपुला लागता कामा नये त्या शोधत्यांना
आड दडतो मी तुझ्या अन् आड तू माझ्या दडावे

येउनी बाहूत माझ्या वेदना तव शांत व्हावी
कुंतली लपता तुझ्या मी दुःखही माझे उडावे

विनंती.
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखावे.