नायक : | होते कोऱ्या कागदापरी आधी माझे मन त्याच्यावरती आज तुझे मी केले नामांकन |
नायिका : | आधी होते उजाड अंगण माझे हे जीवन त्यात आजला तुझ्या प्रीतिचे झाले आस्थापन |
नायक : भग्न न होवो स्वप्न आपले - मनात भीती वसे
दिवसा रात्री स्वप्नामध्ये मी हे पाहत असेकाजळले तव डोळे दिसती
गात्रांना रोमांचित करती
कटाक्ष ते मजला खुणावतीरिक्त दर्पणापरी आजवर होते माझे मन
त्यात आजला तव रूपाचे केले मी चित्रणनायिका : होते कोऱ्या कागदापरी आधी माझे मन
त्याच्यावरती आज तुझे मी केले नामांकन
नायिका : | नसे चैन मज दिवसा वा रात्रीस नीजही नसे रात्र रात्र जागून जिवाला दोष रोज देतसे काय अधिक आता बोलावे? शत्रुसारखे माझ्याशी जे वागे माझे मन |
नायक : | होते कोऱ्या कागदापरी आधी माझे मन त्याच्यावरती आज तुझे मी केले नामांकन |
नायक : वनोवनी अद्याप कुमुदिनी होत्या उमलायच्या नायिका : अपुल्या नजरा एकदुज्यांना होत्या बिलगायच्या नायक : तेव्हा कुठल्या गप्पा होत्या? नायिका : तेव्हा कसल्या गोष्टी होत्या? नायक : भकास असल्या रात्री होत्या! नायिका : तुटक्या ताऱ्यापरी आजवर होते माझे मन नायक : भेटुन तुज, चंद्रात तयाचे झाले परिवर्तन दोघे : होते कोऱ्या कागदापरी आधी माझे मन
त्याच्यावरती आज तुझे मी केले नामांकन
चाल :
गा गा गा गा - गा गा गा गा - गा गा गा गा - ल गा (लांब ओळी)
गा गा गा गा - गा गा गा गा (आखुड ओळी)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली. )
३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील )
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)