भंगून हृदय हे जाता
भंगून हृदय हे जाता
मी जगू कशाला आता?
भंगून हृदय हे जाता
मी एक दीप प्रीतीचा
हृदयात लावला होता
आकांक्षांच्या कुसुमांनी
आणली घरा सुंदरता
भेदी ते लुटून जाता
मी जगू कशाला आता
मी जगू कशाला आता
भंगून हृदय हे जाता
किति कठीण असतिल वाटा
माझ्या, मज कुठे कळाले?
थांबला श्वास आशेचा
स्वप्नांचे अश्रू झाले
सोडून सोबती जाता
मी जगू कशाला आता
मी जगू कशाला आता
भंगून हृदय हे जाता
चाल :
मूळ गाण्याची चाल किंचित ओढाताण करून जशीच्या तशी ( मात्र आधी गाणे ओळखावे लागेल
)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.
)
३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील
)
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)