![]() |
दूरचित्रवाणी हे माध्यम आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसलेलं आहे. ई-टीव्ही मराठी ही अशीच एक मराठी प्रसारमाध्यमातली महत्त्वाची वाहिनी. तिचं मुख्य कार्यालय हैदराबादसारख्या अ-मराठी मुलुखात असलं तरी तिचा प्रमुख निर्माता आणि पडद्यामागचा सूत्रधार मात्र अस्सल मराठी माणूसच आहे – तो म्हणजे श्री. सुहास जहागीरदार. ई-टीव्हीतलेच त्यांचे आणखी एक मराठी सहकारी श्री. प्रकाश फडणीस यांच्यामार्फत त्यांच्या मुलाखतीची परवानगी मिळाली. |