आवाहन !

मी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे ?
मराठी महाजालाच्या जगाच्यात आजकाल मराठी अव्यक्त नाही आहे, शेकडो ब्लाग, काही संकेतस्थळे व माहीतीच्या जगात मराठीची उपस्थिती ही सर्वानाच माहीत आहे मराठीवर्ड-मनोगत-मायबोली-माझे-शब्द-उपक्रम ईत्यादी, पण मला सर्वत्र मराठी लोकचं भेटले पण मला भारतीय मराठी कुठेच भेटला नाही काय कारण असावे ?
भारतीय मराठी हा नवीन शब्द आहे ना ? मला ही नवीन आहे काय करावे !
पण मला नाही भेटला हा मानुस (मनुष्य) का ? हाच प्रश्न मला त्रास देत आहे.

काही दिवसापासुन म्हणजेच ह्म्म एक वर्षाच्या आसपास मी मराठी महाजालावर मी विविध नावाने वावरत आहे तसेच काही ईतर भाषेतील संकेतस्थळे देखील मी पाहात आहे पण मला मराठी व ईतर भाषेच्या संकेतस्थळावर काही गोष्टी अढळल्या त्या मला विस्मयीत करण्यास पुर्ण होत्या.

जेवढे लेखन सामाजिक गोष्टीसाठी हिंदी भाषेमध्ये होते, बंगाली भाषेमध्ये होते तेवढी सामाजिक जाण मला मराठी ई-साहित्यामध्ये भेटली नाही.

एकजण तरी मला सांगा मागील वर्षामध्ये (२००६-२००७) देशामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या पण एके जागी , एका संकेतस्थळावर , एका ब्लाग वर तुम्हाला काही खबर लागली ? नाही ना ? मग ठीक आहे ! काही ह्या बातम्या तुम्हाला माहीत आहेत का ? प्लीज मला ही सांगा. मला माहीत आहे तुम्हाला त्या बातम्या त्या खबर माहीत आहेत पण तुम्ही किती जागी प्रतिसाद दिले ते सांगा, काही हरकत नाही तुम्हाला त्या बातम्या माहीत नसल्यातर मी येथे त्यातील काही निवडक बातम्या येथे देत आहे वाचा विचार करा व मगच लिहा.... मला माहीत आहे शक्यतो येथे एकाद दुसराच प्रतिसाद येणार आहे मी गेली दोन महीने ह्यावरच प्रयोग करीत आहे ! ह्याचा अनुभग आहे मला !

बातम्या ज्या प्रत्येक भारतीयास विचार करावयास लावतील अश्या पण खेद आहे मला मराठीतील एका ही मानवाच्या लेखाची अथवा प्रतिसादाची माहीती कुठेच भेटली नाही:

१. निठारीकांण्ड
२. पोलीओ ची हार
३. आतंकवाद
४. सुचना अधिकार ( १. उपक्रम व २. माझे शब्द येथे एक लेख मिळाला होता)
५. नक्षलवाद
६. भाषीय विवाद
७. शेतकरांच्या आत्महत्या
८. राजकारण
९. विजेची अडचणी
१०.पोलीसांचा नाकर्तेपणा वर
११.राजकारणावर
१२.फिल्मी राजकारण (मराठीमध्ये देखील असावे)
१३.ईतर

१३ हा आकडा अशुभ मानतात पण काय करु !

जर तुम्ही ह्या विषयी कुठेही लिहले असेल (लेख, प्रतिसाद, कविता, गझल काहीही) तर त्याचा पता येथे लिहावा ही अपेक्षाच नाही तर विनंतीच आहे.
कृपा करुन येथे जरुर लिहा तुचे दुवे द्या, व माझा समज... गैरसमज दुर करा ! प्लीज करा !