महाराष्ट्र कर्जमुक्त हवा

महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

१.मुंबईत कफ परेडच्या समुद्रात पाच कि.मी. अंतरावर कुत्रिम बेटे विकसीत करावे.तेथील भूखंडाची विक्री करून महाराष्ट्राची कर्जाच्या विळख्यातून मुक्तता करावी आणि उरलेल्या पेश्यातून विकास योजनांना बख्खळ निधी उपलब्ध करून द्यावा.

२.दोन वर्षा पूर्वी म्हणजे साधारण २६जुल्लेच्या २००४ च्या पावसानंतर हि त्यांनी असेच विधान केले होते रेसकोर्सह मुंबईतील सरकारी मालकीच्या मोकळ्या जागांची विक्री केल्यास महाराष्ट्र चुटकीसरशी कर्जमुक्त होईल. 

३. वीजप्रकल्प,रस्तेबांधणीप्रमाणे धरणंही खाजकीकरणांतून उभारली पाहिजेत. लोकांना किंचित जादा पैसे मोजावे लागतील पण अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागतील.

या तिन्ही विधानाने महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घ्यावासा वाटला.

१.नवी मुंबईत गणेश नाईक यांचच साम्राज्य.पूर्वी मुंबईबाहेर कोकणाच्या दिशेने जाताना नवी मुंबईच्या आसपास मोठं मोठे हिरवेगार डोंगर दिसत.आता डोंगर तर दिसेनाशेच झाले आहेत.दगडांच्या खाणीसाठी सार सपाट झालं.

२.त्यांच्या मतदारसंघात मीरा-भाईदर हा भाग हि येतो तिथे चक्क खाडिमध्येच बांधकाम उभी केली आहेत. तिथे दरवेळी पावसात पाणी जमनीतून बाहेर येते.खाडीत उभ्या राहिलेल्या बिल्डिंगची अवस्था आज पडतील की उद्या पडतील अशी आहे.

३.ते ज्या बँकेचे अध्यक्ष होते तिथे कोट्यवधीच्या रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच उघडकीस आलं.

 मनोगतीला यांच्या विधानावरून आणि यांच्या कामावरून काय वाटत ?