चिकनसाग अर्थात पालकातील कोंबडी

  • हाडेविरहीत कोंबडी( बोनलेस ब्रेस्ट पिसेस) ५०० ग्राम,
  • पालक २,३ जुड्या,फ्रोझन पालक घेतला तर ७५० ग्राम ते१ किलो.
  • २,३ कांदे,२,३ टोमॅटो अथवा टोमॅटोची प्युरी १/२ वाटी. गरम मसाला
  • आले बोटभर, ७,८ लसूण पाकळ्या, ३,४ हिरव्या मिरच्या,मीठ,तेल,
  • मॅरिनेशन साठी दही १ मोठा वाडगाभर(साधारण ५०० ग्राम)
  • फ्रेश क्रीम १ मोठा चमचा
अडीच तास
४,५ जणांना

चिकन चे तुकडे धुवून,साफ करून त्यावर थोड्या खाचा माराव्या.आले लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यावी.त्यातील १ मोठा चमचा पेस्ट ,१ मोठा चमचा गरम मसाला दह्यात घालावा आणि चिकनचे तुकडे त्यात घालावे व  दोन तास मुरवत ठेवावे.
कांदा बारीक चिरावा किवा पेस्ट करावी,टोमॅटोची प्युरी करावी,पालकाची पानेही मिक्सरमधून काढून प्युरी बनवावी.(फोझन चिरलेला पालक तसाच वापरू शकतो.)

डावभर तेल गरम करून त्यात कांदा लालसर परतून घ्यावा,मग त्यात टोमॅटो प्युरी ,१ते १.५ चमचा गरम मसाला,आले लसूण मिरचीची पेस्ट १ चमचा घालावी व परतावे, झाकण ठेवून एक वाफ आणावी,मग पालक घालून ढवळावे,थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्यावे.चवीनुसार मीठ घालावे.

मॅरिनेटेड चिकन थोड्या तेलावर परतून घ्यावे.(शॅलोफ्राय करावे) हे तुकडे पालकाच्या भाजीत घालावे‌,शिजू द्यावे.मुरलेले,तळलेले तुकडे पटकन शिजतात. नंतर थोडे फ्रेश क्रिम घालावे.

पोळी/फुलके/भाकरी/भात कशाही बरोबर गरम गरम खावे.

तांदळाच्या भाकरीबरोबर किवा भाताबरोबर खायला जास्त मजा येते.

माझे पाक-प्रयोग