चार तासात नऊ हजारात घर

इ सकाळची ही बातमी वाचली का?

कॉंक्रिट व थर्माकोलमधून चार तासांत घर

पुणे, ता. २३ - केवळ चार तासांच्या कालावधीत कमी श्रमात व वाजवी किमतीत घर व स्वच्छतागृह उभारण्याचा यशस्वी प्रयोग भोसरीतील माने इलक्‍ट्रिकल्स कंपनीने केला आहे. .......
जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून कॉंक्रिट व थर्माकोलच्या एकत्रित मिश्रणाने तयार करण्यात आलेल्या या घराच्या भिंती व छप्पर ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून पूर्णपणे सुरक्षित आहेत. यामुळे ही घरे कोणत्याही प्रदेशात उभारणे शक्‍य असून, भूकंपासह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत उपयोगी ठरणार आहेत.

माने इलक्‍ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ""कंपनीने केलेल्या प्रयोगात भिंती व छप्पर व फ्लोअरिंग या गोष्टी तयार पद्धतीत उपलब्ध असल्याने अतिशय कमी वेळेत घर उभारता येते. "प्रीकास्ट' कॉंक्रिटच्या दहा फूट उंची व लांबीच्या या भिंतींना थर्माकोलचे आवरण बसविण्यात आले आहे. यामुळे थंडी व उष्णतेचा घरातील तापमानावर थेट परिणाम होत नाही. फ्लोअरिंग व छप्परही अशाच प्रकारे तयार करण्यात आले आहे. भिंती, छप्पर व फ्लोअरिंग खाच्यांच्या साह्याने एकमेकांमध्ये बसविण्यात आले असल्यामुळे घराचा दणकटपणा वाढला आहे.''

ही घरे पूर्णपणे "इको फ्रेंडली' स्वरूपाची असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, ""पारंपरिक पद्धतीपेक्षा ही घरे निम्म्या खर्चात म्हणजे नऊ हजारांत उभारता येतील. यामुळे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागांतही हा प्रयोग यशस्वी ठरेल. ग्रामीण भागातील स्वच्छतागृहे उभारणीच्या मोहिमांमधून तसेच शेतावर ही घरे उभारता येतील. शहरी भागांत झोपडपट्टीला पर्याय म्हणून या घरांची उभारणी करणे शक्‍य आहे. बागा तसेच सार्वजनिक जागांच्या सुशोभीकरणातही हे तंत्रज्ञान वापरता येईल.''

मागे शिर्के सेपोरेक्स कंपनीने असेच घर करून प्रदर्शांत ठेवलेल होते. बहुदा त्यात थम्राकोल नव्हता. त्याचे काय झाले काय माहित. अशी घरे इतकी स्वस्त आहेत मग लोक ती घेत कानाहीत? नऊ हजारातार घर देले तर मी चार पाच घेऊन मोठे घर करीन. असे घर एक एक युनिटच्या स्वरोपात का विकत नाहीत? लोक पाहिजे तेवढी घेतील.

कोणी सिव्हिल इंजिनिअर सांगणार का फंडे?