सुंदर तरुणी फार बघितल्या होत्या, पण असल्या नव्हत्या

सुंदर तरुणी फार बघितल्या होत्या, पण असल्या नव्हत्या

काय नजर! काय अदा!
कोण न मग नाही फिदा?
ह्या बटा की मेघिनी? नेत्र की सौदामिनी?
जो बघतो त्याची हत्या!

सुंदर तू, धुंद ऋतू
मन माझे गेले उतू
मार्ग हे मंदावले, स्पंदही धुंदावले
प्याल्याविण चढतेय नशा

बोलतही तू न जरी
का यावे मज मरण तरी?
तू परी की देवता? का अशी मग्रूरता?
दुसऱ्याचे ऐकून पहा

- माफी
इथे बघा पण त्याच्या आधी
गाणे ओळखता येत आहे का? चालीवर म्हणता येत आहे का? प्रतिसाद काही दिवस झाकलेले ठेवावेत अशी प्रशासकांना विनंती.
पाहिली ना तुजपरी , मी तर असल्या लाख पर्‍या पाहील्या हे ऋणनिर्देशपण आता झाकलेले ठेवावेत व नंतर प्रसिद्ध करावेत असे मला वाटते.