इ मेल फ़ॉरवर्डींग आणि अंधश्रद्धा

मंडळी,

परवा याहु वर एका परिचिताची इ मेल आली. त्यात इंग्रजी मधे हनुमान चालिसा आणि श्लोकानंतर अर्थ. इथपर्यंत ठीक आहे. पण त्यात ही मेल अजुन १० जणांना पाठ्वा म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती ८ तासात सुधारेल. न पाठवल्यास १० वर्षे दुर्दैवाचा काळ ओढवेल अश्या अर्थाचा मजकुर दिसला. ही मेल आली त्यातली बहुतेक मेल ऍड्रेस हे IT / मोठमोट्या कंपनीतले दिसले. एवढे शिकुन सुद्धा जर तरुण पिढी असल्या मजकुरावर विश्वास ठेवत असेल तर कठीण आहे. ही चक्क अंधश्रद्धा आहे.

अहो नुसत्या मेल फ़ॉरवर्ड करुन कोणाची आर्थिक परिस्थिती सुधारेल काय ? कृपया असल्या मेल ताबडतोब डिलीट कराव्यात.

ह्या असल्या प्रकाराना आळा घालणे गरजेचे आहे. यावर आणखी उपाय सुचल्यास जरुर कळवावेत.

अवांतर : मी ती मेल डिलीट केली व पाठवण्याऱ्या व्यक्तीला असल्या मेल पुन्हा न पाटवण्याची सुचना दिली.