अनहोनी हो गयी होनी

भारतीय क्रिकेट टीम चा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे.

तो इतक्या हीन आणि निकृष्ट दर्जाची फलंदाजी करतो की त्याला गल्लीतल्या टीममध्ये पण कोणी घेणार नाही आणि घेतला तर  फलंदाजीला सगळ्यात शेवटी पाठवतील. त्याची फलंदाजी बघताना अक्षरशः कीव येते.

पायांची हालचाल नाही(फूटवर्क), फटका निवडणे नाही (शॉट  सिलेक्शन), बॅट कधीच सरळ नसते, वेगात आलेला चेंडू समजत नाही...आणखी बरेच लिहिता येईल.

त्याची मुख्य जबाबदारी, यष्टिरक्षण. त्यात सुधा असंख्य त्रुटी आहेत. 

भारताबाहेर त्याची कामगिरी (?) कुणाला सांगण्यासारखी नाहीये.

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या शैलीचा अभ्यास करून त्याच्यासाठी तसे डावपेच आखले जातात. धोनीची काही शैलीच नाही तर त्याच्याविरुद्ध डावपेच कसले आखणार? या कारणामुळेच तो आतापर्यंत खेळत आला आहे.

मान्य आहे की त्याचा सॉलिड जॅक असेल, ज्या माणसाला (?) साधी बॅट पण धरता येत नाही असा माणूस कर्णधार ?