विचारा एकच प्रश्न आणि उघडा स्वर्गाचे द्वार...

दोन अगदी सारखे दरवाजे ... एक स्वर्गाचे प्रवेशद्वार आणि एक नरकाचे...पण कोणते कशाचे द्वार आहे हे कुठेच लिहिलेले नाही. प्रत्येक दरवाज्याजवळ अगदी सारखे दिसणारे पहारेकरी...दोन्ही पहारेकऱ्यांना माहिती आहे कोणते दार कशाचे आहे ते! पण, त्यातला एक पहारेकरी फक्त नेहेमी खरेच बोलतो आणि एक नेहेमी फक्त खोटे! पण नेमका कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, हे माहित नाही.एक मनुष्य त्या दोन्ही दरवाज्यांजवळ आला. त्याने कोणत्यातरी एकाच पहारेकऱ्याला फक्त असा एकच प्रश्न विचारायला हवा की त्या प्रश्नाच्या येणाऱ्या उत्तरातून त्याला कळले पाहिजे की स्वर्गाचे दार कोणते आहे? बघा... विचार करा. आणि कोड्याचे उत्तर सांगा (म्हणजेच, तो प्रश्न सांगा जो त्या माणसाने विचारला पाहिजे!)