अशी एकट्याने निघालीस कोठे?

अशी एकट्याने निघालीस कोठे?
सवे घे मला, जात आहेस तेथे ।ध्रु।
अशी एकट्याने ऽऽऽ
निघालीस कोठे ऽऽऽ

कुणी जीव टाके - कळे हे तुला का?
तुझा होउ पाहे - कळे हे तुला का?
प्रसंग काय आहे - कळे हे तुला का? ।१।
अशी एकट्याने ...

नकोस छळुन जाऊ - जिवाची सखी तू
नकोस तोंड फिरवू - जिवाची सखी तू
नकोस हृदय तोडू - जिवाची सखी तू ।२।
अशी एकट्याने ...

अडवील वाट कोणी - करशील काय तेव्हा?
पकडील पाय कोणी - करशील काय तेव्हा?
करील लाडिगोडी - करशील काय तेव्हा? ।३।
अशी एकट्याने ...

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )  लगागा लगागा लगागा लगागा (भाषांतर करताना चालीत बसेल इतपत केलेले आहे.)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )