आकाशवेड

जिंकूनही पुन्हा हरू कसे मी आता?
तू जिंकशील हे करू कसे मी आता?

विद्वान लोक मोजकेच होते तेथे-
संमेलनास त्या स्मरू कसे मी आता?

होकार तू असा दिलास इतक्या लवकर...
स्वप्नांत सांग वावरू कसे मी आता?

दुर्लक्षिली फुले उगाच काट्यांसाठी
नुकसान एवढे भरू कसे मी आता?

आहे जुना ऋणानुबंध या मातीशी...
आकाशवेड पांघरू कसे मी आता?

- कुमार जावडेकर, मुंबई