प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ५

गीताप्रेसचे सन्स्कृत वाल्मिकी रामायण (मूलमात्रम ; पाने ७३४) फक्त १०० रुपयात मिळते.

सन्स्कृतची आवड असल्यास जरूर वाचावे. त्यात अनेक ठिकाणी खगोलशास्त्रीय वर्णने आहेत.त्यावरून रामराज्याभिषेक,वनवासगमन ,खरदूषण वध व सूर्यग्रहण , सीताहरण,वालीवध,त्यानंतरच्या पावसाळ्याचे वर्णन,शरदाचे वर्णन, हनुमानाचे पौष महिन्यात लंकेत जाणे व पौष पौर्णिमेस परतणे,रामाच्या सैन्याने सेतू बांधून चैत्र पौर्णिमेस लंकेत प्रवेश,त्यावेळचे चंद्रग्रहण,अमावस्येस रावणवध व त्यादिवसाचे सूर्यग्रहण या सर्व गोष्टी वर्णन केल्या आहेत. ही खगोलशास्त्रीय वर्णने बरोबर असून गणितात बसतात.त्या स्रर्व प्रसंगाच्या तारखा मी शोधून काढल्या आहेत.(जास्त माहिती माझ्या पुस्तकात मिळेल,(फोनः ०२५१ २२०९४७६ )रामजन्माच्या वेळच्या ग्रहांचे वर्णन १.१८.८,१.१८.९,१.१८.१० श्लोकात आहे.त्यानुसार कर्क लग्नी,पुनर्वसू नक्षत्री सकाळी चंद्र व गुरू होते.पाच ग्रह उच्चस्थानी होते,रामजन्म दुपारी झाला तेव्हा चैत्र शु.९ व पुष्य नक्षत्र होते.रवी मेषमधे,मंगळ मकरमधे,गुरू कर्कात,शुक्र मीनेत व शनी तूळजवळ होता.