पर्यावरणाचा समतोल राखणारे वृक्ष

पर्यावरणाचा प्रश्न सध्या मोठा आहे. पर्यावरणाचा समतोल राखून एखादा विशिष्ट देशच नव्हे तर संपूर्ण पृथ्वी वाचविण्याचे आव्हान आहे.
भारतीय संस्कृतीत वृक्षांचे महत्व सांगितले आहे. फळे, फुले, सावली, देखणेपण देण्यासह वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करतात. 
मला खालील मुद्यांच्या अनुषंगाने माहिती हवी आहे.
१. पर्यावरणाचे संरक्षण / पर्यावरणाचा समतोल राखणा-या महत्वाच्या वृक्षांची / रोपांची नावे.
   नावांसह त्यांच्या वाढीस लागणारा वेळ, आकारमान, फळे-फुले (देत असल्यास), ही माहिती.
२. अशी माहिती कोठे मिळू शकेल. (पाठय़पुस्तक, एखादा कोश, वेबसाईट इ.)