अलगद असेच भरून येतात डोळे पुन्हा पुन्हा
प्रश्न मनात सलत राहतो घडलाय काय गुन्हा?
घोंगावत,धावत येते वादळ पुन्हा पुन्हा
उरत नाहीत साक्षीला मग घडलेल्याच्या खुणा
आठवणींच्या गर्भातले रुजणे पुन्हा पुन्हा
तीच कळ, तोच घाव,काळीजतोड वेणा
तलखी तीच, तृषा तीच,भास पुन्हा पुन्हा
मृगजळात फुलती फुले,बहर तळपत्या मना
हसत राहीन, फुलत राहीन आतून पुन्हा पुन्हा
अलोट तुझ्या प्रेमाचा असिमसा नजराणा........
शीला.