शेवटचा माझा मुक्काम हाच......

कशास दाखवु जखमा कुणाला?
विझवले मी डोळ्यात आसु
ओलांडली थेंबांनी वेस कधीच
वाट तीच फ़क्त ओठात हासु

कशाला देतेस तुही साक्ष खोटी?
मी कधी तुझा नाकारला गुन्हा?
हा जुनाच दरवळतो ग सुवास
गंध तो न मी उधळला पुन्हा

बेरंग न करता तुझ्या मैफ़ीलीचा
बहराचे गीत मी गात राहीलो
कानी सा-यांच्या सुर गोठला
फ़क्त मीच अंतरात रंगलेलो

ईथे 'आपला' कुणा म्हणु मी
श्वास माझाच मला परका झाला
उसण्याच माझ्या या जगण्याला
फ़ुटक्या क्षणांचा ग काय हवाला?

पथातले सारे यात्री भागले
चांदण्यात मी उरलो एकटाच
ईशारा नियतीचा जाणिला मी
शेवटचा माझा मुक्काम हाच....
शेवटचा माझा मुक्काम हाच....

--सचिन काकडे[फ़ेबृवारी १२,२००७]
फ़क्त तुझ्यासाठीच "हा खेळ सावल्यांचा"