अर्थसंकल्प २००८

या अर्थसंकल्पाला राजकीय, निवडणुकांवर डोळा ठेऊन केलेला, वगैरे, वाद वाढवायचा नाहीये. तर आजच्या मटा मध्ये सुरेश प्रभुंची जी प्रतिक्रिया आली आहे ती विचार करण्यासारखी आहे.
हा जो कर्जमाफीचा ६०००० कोटींचा बोजा आहे तो कोणाच्या डोक्यावर पडणार आहे ? सगळीकडे खिरापत वाटताना त्या पैशांचा स्त्रोत अर्थमंत्र्यांनी कुठेच दाखवला नाही. या सरकारला आपल्या देशाची जराही चिंता आहे असे वाटत नाही. गेल्या पांच वर्षांत यांनी काय केले ?
अल्पसंख्यांकांना अवाजवी झुकते माप दिले.
जातिभेद वाढवले.
धनदांडग्या उद्योगपतींची धोतरे बडवून त्यांना देश ताब्यात दिला.
शेअरबाजार म्हणजेच देशाच्या सुबत्तेचा पुरावा, असे लोकांना भासवले.
गरीब जनतेला अगदीच बुडायला आल्यावर आता मदतीचा आभास निर्माण केला.
एवढे मोठे दोन अर्थतज्ञ असताना सुद्धा, जर वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याचे धाडस त्यांच्यात नसेल तर या देशाचे काय होणार ?

कोणी अर्थतज्ञ यावर आपले विचार मांडेल का ?