चार ओळींचे भाषांतर

अहमद नदीम क़ासमी यांच्या  उर्दू ओळी -

क़बूल है तेरी किब्रियाई
मगर कभी तूने ये भी सोचा
यहाँ भी तू है, वहाँ भी तू है
ग़रीब इन्साँ कहाँ रहेंगे?

मराठी--

कबूल तू सर्व विश्वव्यापी
विचार केलास ईश्वरा तू?
इथेही तू, त्या तिथेही तू अन्
भणंग आम्ही, कुठे रहावे?

 - चित्तरंजन