स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई (भाग ४)

... सुभाष घई म्हणाले,"हे बघ. आता सगळ्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी सगळीकडे जाहीर करून टाकलेले आहे कि तू खरा स्पायडरमॅन असून तू भारतात आहेस. आणि अमेरिकेत आता चार लोकांना चावण्यासाठी तो रेडिओऍक्टिव्ह कोळी शोधण्याच्या प्रयत्नात अमेरिकन सरकार आहे. तो कोळी पळून भारतात आलेला आहे हे ही त्यांना माहीत झाले आहे. मला तुझ्या सोबत काही मराठी चित्रपट बनवायचे आहेत. तेव्हा आता तुझा प्लॅन काय? तू रेस चित्रपट पूर्ण करणार की मझ्या चित्रपटात काम करणार की अमेरिकेत परत जाणार की आधी बरा होणार आहेस? उद्या प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सकाळीच हॉस्पीटल मध्ये येतील आणि तुला हजारो प्रश्न विचारतील. त्या आधी तू येथून गायब हो आणि माझेकडे चल." 

कोळी हे सगळे ऐकत होता, तो आत आला आणि म्हणाला, " नमस्कार, सुभाषजी. मीच तो कोळी."

सुभाष : " बरे मग. आता काय करणार तुम्ही दोघे?"

कोळी : " माझा विचार आहे, पुन्हा पीटरला चावण्याचा आणि त्याला त्याची शक्ती पुन्हा देण्याचा, दोन वेळा मी त्याला चावेल. दोन्ही हातांना आणि पायांना चावेल. मग पीटर सगळ्या चित्रपटात स्टंट सीन करेल. आणि मग आम्ही अमेरिकेत परत जावू. "

पीटर : " आयडिया छान आहे. पण तोपर्यंत राहायचे कुठे?"

सुभाष : " तुमच्या राहाण्याची चिंता नका करू. मी करेन व्यवस्था. मिडिया वाल्यांना पण आपण सगळे सांगू आणि त्यांना विनंती करू की..."

तेवढ्यात त्या रुममध्ये शाहरूख आला. " क क क क कीडा, कुठे आहे? मला तुमचा सगळा डाव माहिती झाला. 'परदेस' जाण्याचा. मी ऐकत होतो. पडद्या आ आ आ आडून ! मी सगळ्यांना बोलावले आहे येथे. पोलीस येत आहेत. पकडायला तुम्हाला! "

किडा : " आता वेळ आली आहे पीटरला पुन्हा चावण्याची. "

किडा चावण्यासाठी पीटर्कडे जावू लागला. तो पीटरला चावणार एवढ्यात सुनील शेट्टी ने प्रवेश केला आणि पीटर ला बाजूला सारून स्वत : किड्यासमोर गेला. हे सगळे एवढ्या वेगाने घडले की कोळी सुनीलला चावला. पायाला. आणि तेवढ्यात तेथे सनी देओल आला.... कीडा संतापून सनी देओलला कडाडून चावला.... (क्रमश :)