स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई ( भाग : २ )

[ सूचना : ही कथा काल्पनीक आहे ]

आतापर्यंत काय झालं? [ योगायोगाने वयस्कर स्पायडरमॅन मुंबईच्या एक ऑफीसमध्ये येतो. त्याला अमेरिकेचा आणि तिथल्या गुन्हेगारांचा कंटाळा आल्याने तो काही काळ भारतातच राहायचे ठरवतो. वय झाल्याने त्याची जाळीसुद्धा तुटून जाते. झाल्याने कोणी ओळखू नये म्हणून तो शक्यतो बुरख्यावीनाच फिरायचे ठरवतो.त्याला त्या आफीसमध्ये पार्ट टाईम नोकरी मिळते. मग आणखी एका नोकरीच्या शोधार्थ असतांना त्याला उन्हामुळे चक्कर येऊन त्याची टक्कर सुनील शेट्टीच्या गाडीशी होते ... पुढे वाचा ]

सुनील : अरे अरे. माफ कर. बैस गाडीत ( गाडीत बसल्यावर ) कोण आहेस तू? कोणत्या देशातला आहेस?

पीटर : मी, ...पीटर पार्कर... पण हे कुणाला सांगू नका. मीच स्पायडरमॅन असतो. पण तुम्ही तर अरनॉल्ड श्वार्झनेगर सारखे दिसता..

सुनील : वा! छान. आभारी आहे. आहे का एखादा हॉलीवूड मध्ये रोल? आणि तुझे भारतात यायचे प्रायोजन?

पीटर : मी कंटाळलो आहे सध्या सगळ्या गुन्हेगारांना... पोलीस मग स्वस्थ बसून राहातात मी गुन्हेगारांना पकडत असलो की! मला एका ऑफीसमध्ये पार्ट टाईम जॉब मिळाला आहे. आणखी एखादा रोल आहे का माझ्यासाठी बॉलीवूडमध्ये? मी तुम्हाला स्टीवन स्पीलबर्ग चा पत्ता देतो आणि तुम्हालाही हॉलीवूडमध्ये रोल मोळवून देतो.

सुनील : चालेल. चल मी एका ठीकाणी तुला घेवून चलतो.

......

(दूर एका पर्वतावरच्या गुहेमध्ये अक्षय, अनील, सैफ, कत्रीना वगैरे मंडळी रेस लावत लावत येतात आणि अचानक गुहेत वेल्डींग करू लागतात. चर्र चर्र असा आवाज येतो. आणि गातात "रेस वेल्डींग की.."

तेथे सुनील आणि पीटर येतात. त्यांना हे वेल्डींग चे गाणे बघून आश्चर्य वाटते. दोघेसुद्धा वेल्डींग करतात आणि नाचून गाणे म्हणतात. मग सुनील पीटरला रेस मध्ये काम मिळवून देतो. पीटर सुनीलला स्टीवनचा पत्ता देतो. त्या रात्री स्पायडरमॅन सुनील चे अभार मानून एका हॉटेलमध्ये थांबतो. रेस ची शूटींग पुढच्या एका रविवारी होणार असते.)

सकाळी सहज फिरायला जायचे म्हणून तो साध्या कपड्यांत सी.एस.टी. स्थानकावर आला. तिकीट काढून लोकलमध्ये बसला. दादर आल्यावर पीटरचा जीव गर्दीमुळे गुदमरू लागला. दरवाज्यातून त्याने बघीतले तर हजारो लोक लटकत होते. तो विचार करू लागला," बापरे, येथे तर माझ्यापेक्षा धोकेदायक पद्धतीने सगळे लटकत आहेत."

घाटकोपर आल्यावर गर्दीमुळे पीटर रेल्वे स्थानकावर फेकला गेला. लोकांनी त्याला होस्पीटलमध्ये दाखल केले. हॉस्पीटल मध्ये तीन दिवस आराम केल्यावर चवथ्या दिवशी त्याला डिसचार्ज मिळणार असतो. त्याच्या आदल्या रात्री, हॉस्पीटलच्या खिडकीतून एक कीडा (कोळी) रागारागाने पीटरकडे बघत होता. कोळी म्हणाला," ए. उठ. बाहेर ये...पटकन "

[क्रमश : ]