एक "मा.त्र" दोन दिवसाचे जगणे!

नमस्कार !
या "मा.तर" चा अर्थ माहिती  तंतरद्यान अभियंते असा आहे!
ज्यातली ९०% जनता ही शनिवार-रविवाराचा सुखासाठी आठवडाभर सासुरवास सोसते!
असो तर नमनाला घडाभर तेल ओतले आहे!
आधीच एक खुलासा--  मीही एक "मा.तर" आहे. (अगदी सर्वसाधारण नमुना)
मी माझ्या अशाच एका "मा.तर"शी चर्चा करत होतो. मी म्हणालो की शनिवार पण आता कामाचा दिवस का करू नये?
माझा मित्र मला म्हणाला होता " अरे तसंही आपण रोज उशीरापर्यंत काम करतोच की! मग उगीच शनिवार काम का करावं?"
आणि  मग मला हा प्रश्न पडला की "आजकालचा "मा.तर" तरुण हा जगापासून तुटत तर नाही चाललेला ना?" मी तर माझं नक्की सांगू शकतो की खेळ- नाटक ही फक्त शनिवार रविवाराची मक्तेदारी झाली आहे आणि  - त्यातही अऱ्धा वेळ झोपण्यात जातो!!
कविता फक्त मनोगतवर वाचतो मी...
पुस्तक हातात धरूच शकत नाही इतकं काम...
पण मित्रहो यात नवीन काहीच नाही ! जो मुख्य मुददा मला सतावतो आहे तो हा-
"शनिवार आहे ना! " या भरवशावर आपण आपले ५ ही दिवस जगापासून वेगळे घालवत आहोत! जणू काही आयुष्यातून दोन तास देणे हे शनिवारी भरपूर जगण्याने भरून येणार आहे!!
किती तरी वेळा संध्याकाळचा सूर्य मावळताना बघितलेला नाही!
संध्याकाळी ६ नंतर निघणे ही एक दुर्मिळ आणि  "साजरी" करण्याची गोष्ट झाली आहे!
अशी कितत्री उदाहरणे देता येतील...
--कामाच नियोजन आणि  थोडी खंबीर भूमिका आवश्यक आहे!
आता मी रोज ठराविक वेळात घरी जातो...
आणि  विश्वास ठेवा मित्रांनो, रोज आपली आवडती गोष्ट करण्यात घालवलेले २ तास हे माझ्या कामाचा दऱ्जा सुधारून जातात
मी सुचवलेला उपाय साधा आहे पण सोपा नाही याची मला पूर्णं जाणीव आहे.
--आपली मते विचार आणि  विवाद स्वागताऱ्यः आहेत! (नसले तरी लोक लिहिणारच )