(वाटले बरे किती)

 आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल वाटले बरे किती

भेटतात रोज बटबटीत चेहरे किती!
आणतात आव पण  उगाच  लाजरे किती!

मी अजून चाचपून चेहऱ्यास पाहतो
ओरबाडलेस काल पाडले चरे किती?

प्रश्न हा विचारतात माकडास माकडे-
बांधतात माणसे उगाच ही घरे किती?

टंच पोर राहते घरी म्हणे समोरच्या
आणि सदनिके पुढे  श्वान चावरे किती!

ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले मला झकास! वाटले बरे किती!!

सांगतेस आजकाल चालले बरे तुझे!
भरभरून  बोललीस, यातले खरे किती?

चालवेल ना तुला अजून चार पावले
लागते  विडी मुळेच आज धाप रे किती?

ढोसशील मैफलीत खूप आज, पण उद्या,
उतरण्यास सरबते  नि मागशील रे किती?

पाडलेस तू मला  जगासमोर नागडे
काढशील "केशवा" अजून  लक्तरे किती?