(रस्ता)

माझी प्रेरणा अनिरुद्ध१९६९ यांचा रस्ता

(रस्ता)

का असे हे तोंड तू वेंगाडले
दोन  खोटे दात खाली सांडले

लांडगोबा का पिगांशी वाकडे?
काय सांगू शेपटाला शेकले

मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीं मी चार  त्यांचे पाडले

तू कशाला हाक निघताना  दिली
ऐकुनी  खिडकीत डोळे  हालले

आठव्याचे काय मी आता करू ?
लांबले पण पाळणे ना थांबले

लोक हे वेळी अवेळी भेटती
आणि म्हणती वेड  बहुधा लागले

सांग तू वसुधे मला हे एकदा
काय पाण्यानेच सारे  भागले?

ती जशी दिसते तशी नाही खरी
मेकपाचे  लेप जाडे  थोपले

शेवटी तो माणसागत वागला
भांडतांना नियम नाही पाळले

वाट आता राहिली ही शेवटी
गाव कविते तू जरी हे व्यापले