जा रे जा योग्या तू निघून जा
जा रे जा योग्या तू निघून जा ।
ही आहे प्रेमिकांची नगरी ।
इथे प्रेम हीच पूजा ॥ धृ ॥
प्रेमाची पीडा गहिरे सुख रे ।
प्रेमाविना हे जीवन दु:ख रे ॥ १ ॥
जीवनातूनी कशी सुटका रे ।
रे नदीसोबत दोन्ही किनारे ॥ २ ॥
ज्ञान्या असे ज्ञानाला सीमा ।
घागरीत जणू जलधीजला त्या ॥ ३ ॥
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०२०३
काय म्हणता हा प्रश्न फारच सोपा आहे! थांबा. थांबा. थांबा.
मी अजून प्रश्न तरी कुठे विचारला आहे.
हे गाणे तर ओळखायचेच आहे. मात्र गुण आहेत मूळ हिंदी गाण्याचा चित्रपट ओळखण्याला.
तेव्हा तो ओळखा बरे!