षट-मिती चित्रपट आता भारतात !

नुकतीच एक बातमी वाचनात आली (२४ मे २००८, इकॉनॉमिक टाईम्स, मुंबई), पण वेळ आज मिळाल्यामुळे सुपूर्त आत्ता!!! असो.

"ऍड-लॅब्स षट-मिती चित्रपट निर्मिती व चित्रपटगृहाची निर्मिती आग्रा येथे करण्यात आली. अनुपम खेर यांची भूमिका असलेल्या ३० मिनिटांच्या चित्रपटाचे नाव आहे - इंडिया इन मोशन.

नेहमीच्या त्रिमिती दृश्यांबरोबरीने 'गंध, स्पर्श व इंटरऍक्टिव्हिटी (? )' यांचाही चित्रपट पाहताना आनंद घेता येईल. अश्या चित्रपटगृहांची साखळी आग्र्या पाठोपाठ गोवा, जयपूर, तिरूपती व आंतरराष्ट्रीय हवाईतळ; येथे पोहोचेल. "

मग, काय मंडळी असे षट-मिती चित्रपट पाहायला तयार आहात का?

नुसता विचार करा, 'धारावी' नामक षट-मितीत प्रदर्शित झाले व तुम्ही तो पाहिल्यावर तुम्ही चित्रपटगृहाबाहेर पडतानाची तुमची मानसिक स्थिती / अवस्था?

अर्थात, चांगल्या चित्रपटांचा चांगला अनुभवही गाठीशी बांधता येईलकी!!!!!!!!