आशा आणि अपेक्षा
आशा आणि अपेक्षा -
याभोवतीच
फिरत असतो जीव, त्याच त्या चाकोरीत
परिस्थितीनुसार आशाअपेक्षांची
त्रिज्याच काय तर होते
फक्त कमी जास्त!
आपल्यात, समाजात बदल घडतील ...
आणि
ते आपल्याला अनुकूल असतील ..
म्हणून
वाट बघत बसणाऱ्या!
या दोघीही सारख्याच आहेत
चिवट आणि निरर्थक!