गोट्यांचे गणित

अजय, विजय आणि सुजय हे तिघेही शाळासोबती. गोट्या खेळण्यात कोण जास्त पटाईत याबाबत काहीही बोलणे अवघड होते.

एका रविवारी तिघेही अजयच्या घरी गप्पा मारत बसले होते. त्यांच्या चड्ड्यांचे खिसे अर्थातच गोट्यांनी भरले होते. अजयला एक खेळ सुचला.

त्याने विजय आणि सुजयला त्यांच्याकडे किती गोट्या आहेत ते विचारले. त्या प्रत्येकाकडे जितक्या गोट्या होत्या, तितक्याच गोट्या अजयने त्यांना दिल्या (म्हणजे विजयकडे पाच असतील, तर त्याला पाच दिल्या; सुजयकडे सात असतील, तर त्याला सात दिल्या). मग विजयलाही त्याने तेच करायला लावले - अजयकडे असतील तेवढ्या गोट्या त्याला देणे आणि सुजयकडे असतील तेवढ्या गोट्या त्याला देणे. आणि शेवटी सुजयनेही हेच केले.

आता प्रत्येकाकडे २४ गोट्या झाल्या.

सुरुवातीला प्रत्येकाकडे किती गोट्या होत्या?