(राधिका)

मिलिंद फणसेंची राधिका  वाचली आणि आम्हाला धडकी भरली काही जुन्या स्मृती जाग्या झाल्या

तुझ्यासवे रास खेळणारी नगण्य होते अनामिका मी
तुझ्या निळाईत रंगल्याने अता न उरले कुमारिका मी

न गप्प मी राहणार आता, तुझ्या गृही सांगणार सारे
अहो जिला फसवलेय ह्याने युगे युगे तीच राधिका मी

तुझ्या महाली शिरून मी तू पहाच जो थयथयाट करते
तुझ्या मनी मग अखंड भीती बनेल जी तीच त्राटिका मी

समाज भीती मला न आता, नि,जाण याची तुला असूदे
सबाह्य अभ्यंतरी तुला जी छळेल रे तीच चंडिका मी

ठरेल न्यायालयात दारा, बनेल सहचारिणी अता ही
म्हणून आक्रोश मूक माझा, मुकीच गातो विलापिका मी...