मेंदी व शाळांचे धोरण

नमस्कार,

नुकतीच वृत्तपत्रात पुढील सारांशाची बातमी वाचली.
एका इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थिनींना मेंदी लावण्यास मनाई केली. पतित पावन संघटनेने आंदोलन केले. मेंदीमुळे विद्यार्थिनींचे लक्ष विचलित होते, असे समर्थन शाळाचालकांतर्फे करण्यात आले.

काही प्रश्न
१. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मेंदी लावण्यास परवानगी असते. इंटरनॅशनल व कॉनव्हेंट स्कूलमध्ये नसते. हा फरक का ?
२. अशा मनाईमुळे भारतीय संस्कृतीला विऱोध होतो, असे मानावे का ?
३. मेंदी लावण्यामुळे विद्यार्थिनींचे लक्ष विचलित होत, हे पटण्यासाऱखे आहे का ?
४. एकाच राज्यातील दोन निराळ्या धोरणांच्या शाळांमुळे दोन निराळ्या संस्कृतींमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी वाढतील. याचे दूरगामी परिणाम होतील का ?
५. या संदर्भात एखादा कायदा केला जावा का ?  की कायद्याने हे प्रश्न सुटणारे नाहीत ?